जळगावात कवायत निदेेशकांमध्ये ‘फायटींग’
जळगाव पोलिस कवायत मैदानावरील घटना : एका कर्मचार्यास दुखापत
जळगाव : हॉटेलात मद्यप्राशन करताना झालेल्या कुरबुरीवरून जळगाव पोलिस मुख्यालयात कवायत निदेशक (डी.ई.) म्हणून कार्यरत असलेल्या दोन पोलिसांमध्ये पोलिस कवायत मैदानावरच जोरदार हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची दोन गुरुवारी जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्यांमध्ये रंगताना दिसून आली. त्यात एक कर्मचारी बॉक्सर असून दुसर्या कर्मचार्यास दुखापत झाली असून जखमी पोलिसावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. मारहाण करणारे दोघाही पोलिस कर्मचार्यांना दोन दिवसांपूर्वी भुसावळला पाठविण्यात आले व तेथून आल्यानंतर दोघांनी एकाच हॉटेलात मद्यप्राशन केले. याच ठिकाणी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यातून दोघेही पोलीस मैदानावर आमने-सामने आले व दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिस्तीचे खाते समजले जाणार्या पोलीस दलात कर्मचार्यांकडून बेशिस्तपणा केला जात असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.