ट्रकची दुचाकीला धडक : यावलच्या तरुणाचा मृत्यू


यावल : यावल-चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने यावलमधील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात वढोदा गावाजवळ झाला. या अपघातात सागर उर्फ यश विलास कोळी (बोरोले नगर, यावल) या तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणाचा अपघातात मृत्यू
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरून यावलकडून चोपड्याकडे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रक (जी.जे.3 बी.व्ही.7372) घेऊन चालक बाबुभाई मंगाभाई झाला (रा.सुलतानाबाद, जि.जुनागड, गुजरात) हे जात असताना चोपड्याकडून यावलकडे दुचाकीवर सागर उर्फ यश विलास कोळी (रा.बोरोले नगर, यावल) येत असताना ट्रकने धडक दिल्याने कोळी हा गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत त्यास जळगाव येथे खाजगी दवाखान्यात हलवले जात असताना पचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात धनराज भावलाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे. ट्रक व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !