जळगावात 1 डिसेंबर रोजी लेवा पाटीदार समाजाचा विवाह मेळावा
इच्छुकांना नाव नोंदणीसाठी आपले परीवार वाचनालयात संपर्काचे आवाहन
भुसावळ : सकल लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुकांचा महामेहावा जळगावातील एम.जे.कॉलेजमागील एकलव्य क्रीडा संकुलावर 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होत आहे. मेळाव्यासाठी वधू-वर सूची तयार केली जता असून समाजातील इच्छूक वधू-वरांनी शैक्षणिक, कौटुंबिक व्यावसायाची माहिती आपल्या फोटोसह भुसावळ येथील आपले परीवार वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळा रोड यथे सकाळी सात ते दहा व सायंकाळी पाच ते सायंकाळी सात या वेळेत जमा करावे, असे आवाहन समन्वयक शांताराम पाटील यांनी केले आहे.