रावेरात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडेंची पायी गस्त
रावेर : रावेर शहरात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आपल्या कर्मचार्यांसोबत कायदा-सुव्यवस्था अबाधी ठेवण्यासाठी पायी गस्त सुरू केली आहे. दररोज पोलिसांकडून गस्त घातली जात असल्याने अप्रिय घटनांना आळा बसणार आहे. रावेर शहरात सायंकाळच्या सुमारास बेशिस्त वाहनांच्या अनेक तक्रारी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्याकडे येत होत्या. यांनी या निमित्ताने दररोज रावेर शहरात पायी पेट्रोलींग करायला सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्या सोबत पोलिस उप निरीक्षक मनोहर जाधव, महेंद्र सुरवाडे, पुरुषोत्तम पाटील, मंदार पाटील, सुकेश तडवी, सुनील वडणेरे, सचिन गायकवाड, भागवत धांडे उपस्थित होते. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक आदी ठिकाणी पायी पेट्रोलिंग करण्यात आली.

