वरणगाव विकासोच्या चेअरमनपदी कैलास माळी
वरणगाव : विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संभाजीराव देशमुख तर व्हा.चेअरमन अन्नपूर्णा धनगर यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी संचालक मंडळातून चेअरमनपदी कैलास माळी व व्हा.चेअरम पदी जनार्दन इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीवेळी संचालक चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे, किशोर भंगाळे, बाळकृष्ण धनगर, जितेंद्र चौधरी, विष्णू खोले, सुरेखा चौधरी, रजनी जावळे, गणेश कोलते, संभाजीराव देशमुख, अन्नपूर्ण धनगर, अनिल वंजारी, सोसायटीचे सचिव जे.व्ही.आढाव उपस्थित होते. या निवडीबद्दल चंद्रकांत हरी बढे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुधाकर जावळे, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, शहराध्यक्ष संतोष माळी आदी उपस्थित होते.

