अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
मुक्ताईनगरात वाढदिवसानिमित्त सत्कार : गरजूंना फळ वाटपासह विविध उपक्रमांचे आयोजन
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन मंगळवारी नवीन मुक्ताई मंदिरात करण्यात आले. प्रसंगी अॅड.रोहिणी खडसे यांची केळी व फळ तुला करण्यात आली. गरजूंना या फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी पक्षातर्फे जल्लोषात रोहिणी खडसेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
अॅड.खडसे यांची केळी तुला
अॅड.रोहिणी खडसे यांच्या आगमनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची केळी तुला करण्यात आली. सोहळ्याचे प्रास्ताविक ईश्वर रहाणे यांनी केले. प्रसंगी अध्यक्षस्थानी रवींद्र पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे,विनोद तराळ यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादीचे पक्ष संघटन वाढवण्याचा संकल्प
अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक जण नवीन संकल्प करत असतो. यंदाच्या वाढदिवसाला येणारे संपूर्ण वर्षभरात पक्ष संघटन वाढविण्याचे संकल्प मी करत आहे. खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तर नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाने पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. यासाठी प्रत्येकाने कार्य करायचे आहे. पक्षाचे विचार अधिक ताकदीने समाजापर्यंत पोहचविण्याकरिता सगळ्यांनी सज्ज व्हायचे आहे. यासाठी कधीही कोणालाही पक्षाच्या कामासाठी मी हवी असल्यास मी तिथे हजर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले नाथाभाऊ आणि रोहिणी खडसे यांच्या पक्ष प्रवेशाने तालुका राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य आले असून सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पक्ष संघटन वाढवायचे आहे.
बीएचआरशी संबंध नाही : खडसे
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे म्हणाले की, पक्ष संघटना वाढविण्याससाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवायला हवा तसेच अनेक राजकीय कोपरखळ्या मारत त्यांनी बीएचआर या प्रकरणात सगळ्यांना आमचा संबंध वाटत असलातरी त्या फाईलची चौकशी काढण्याशी आमचा संबंध नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. त्याची चौकशी आदेश मागील सरकारमध्ये देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवनराजे पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, विलास धायडे, राजु माळी, संदीप देशमुख, दशरथ कांडेलकर, सुधाकर चोपडे, किशोर चौधरी, विशाल महाराज खोले, अतुल चौधरी, विजय सोनार, विकास पाटील, शाहीद खान, लता सावकारे, कल्याण पाटील, रवींद्र दांडगे, भाऊराव महाराज पाटील, माणिक पाटील, गणेश तराळ, श्रीराम चौधरी, राजेश ढोले, मुन्ना बोडे, शिवराज पाटील, संजय कोळी, संजय माळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल महाराज खोले तर आभार तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील यांनी मानले. दरम्यान, मुक्ताईनगरातील यशपाल जैन यांच्या हॉस्पिटलमध्ये रोहिणी खडसे मित्र परीवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 60 पिशवी रक्त संकलित करण्यात आले तसेच शिरसाळा येथे रामभाऊ पाटील, उचंदा यांच्यातर्फे अॅड.रोहिणी खडसे यांची लाडू तुला करण्यात आली.

