ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी उज्वला बागुल
मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी धनंजय सापधरे यांची नियुक्ती
भुसावळ : ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी येथील पत्रकार उज्ज्वला बागुल यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर (अमळनेर) व महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य विकास महाजन (पारोळा), राज्य समन्वयक राजेश सैनी यांनी भुसावळ येथील कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेत बैठक घेतली. या बैठकीत तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भुसावळ तालुकाध्यक्षपदी पत्रकार उज्ज्वला बागुल यांची तर मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी धनंजय सापधरे यांची नियुक्ती करण्यात आली.
नूतन पदाधिकार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
नुकत्याच जिल्हा सचिव म्हणून नियुक्त झालेल्या अॅड.जास्वंदी भंडारी व तालुकाध्यक्ष उज्ज्वला बागुल यांनी जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य विकास महाजन यांचे स्वागत केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष हर्षल गोराडकर, अॅड.निलेश भंडारी, नरेश साळी (अमळनेर), उत्कर्ष भंडारी, तळेले यांच्यास सदस्य उपस्थित होते.

