भुसावळात दहा हजारांचा विमल गुटखा जप्त


भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : पानटपरी चालकाला पोलिसांनी केली अटक ; तीन दिवसाची सुनावली कोठडी

भुसावळ : शहरातील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर चौकात एक पान टपरीत गुटख्याचा साठा असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकत पानटपरीतून राज्यात प्रतिबंधीत असलेला 10 हजार 373 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. 2 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली तर पानटपरी चालकाला अटक करण्यात आली. दिलीप तुळशीराम जावळे (55, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटाले, सहा.निरीक्षक कृष्णा भोये, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, एएसआय तस्लीम पठाण, कृष्णा देशमुख, रवींद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, सुभाष साबळे, योगेश माळी, जावेद शाह, प्रणय पवार आदींनी केली.

प्रतिबंधीत गुटखा केला जप्त
आरोपी दिलीप तुळशीराम जावळे याची आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर चौकात स्विट पान मसाला नावाची टपरी असून त्याची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सहा हजार 545 रुपये किंमतीचा केशरयुक्त पानमसाला, दोन हजार 574 रुपये किंमतीचा केशरयुक्त पानमसाला, 924 रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखूची 28 पाकिटे, 330 रुपये किंमतीची 15 तंबाखूची पाकिटे मिळून 10 हजार 373 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !