विशेष उत्सव गाडींच्या फेर्‍यांमध्ये वाढ


भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे काही उत्सव विशेष गाड्यांच्या फेरीत वाढ करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये झाली वाढ
डाऊन 02913 बांद्रा टर्मिनस ते सहरसा एक्स्प्रेस 6 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. अप 02914 सहरसा ते बांद्रा टर्मिनस एक्स्पे्रस
08 ते 12 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. डाऊन 09019 उधना छपरा एक्स्प्रेस 6 ते 27 डिसेंबरदरम्यान दर रविवारी धावेल. अप 09020 छपरा-उधना एक्स्प्रेस 8 ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. डाऊन 09057 उधना-मंडुआडीह एक्स्प्रेस 4 ते 25 डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी धावणार आहे. अप 09058 मंडुवाडीह-उधना एक्स्प्रेस 6 ते 27 डिसेंबरदरम्यान दर रविवारी धावणार आहे. डाऊन 02905 पोरबंदर-हावडा एक्स्प्रेस 6 ते 27 डिसेंबरदरम्या दर रविवारी धावणार आहे. अप 02906 हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस 8 ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. डाऊन 09205 ओखा ते हावडा एक्स्प्रेस 2 ते 31 डिसेंबरदरम्यान दर बुधवार व गुरुवारी धावणार आहे. अप 09206 हावडा ते ओखा एक्स्प्रेस 4 ते 26 डिसेंबरदरम्यान दर शुक्रवार व शनिवारी धावणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !