लखनऊ, वाराणसीसह जयनगर, पटना एक्स्प्रेसच्या वेळेसह थांब्यात बदल


भुसावळ : अप लखनऊ-मुंबई विशेष गाडीसह लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी, लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस पटना विशेष गाडीच्या वेळेत तसेच थांब्यांमध्ये 1 डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे. बदलाची नोंद रेल्वे प्रवाशांनी धघ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मुंबई -लखनऊ विशेष गाडी
अप 02533 लखनऊ-मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 9.30 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबईला 10.45 वाजता पोहोचणार आहे. अप दिशेला या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक येथे थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02534 मुंबई-लखनऊ विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून 8.25 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी लखनऊला 8.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला डाऊन दिशेत नाशिक, मनमाड, भुसावळ व खंडवा येथे थांबा देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी विशेष गाडी
डाऊन 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी ही गाडी प्रस्थान स्टेशनपासून दोन वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी वाराणसी स्टेशन येथे 7.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, रावेर, बर्‍हाणपूर, खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 01072 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी प्रस्थान स्टेशनपासून 3.50 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन येथे 10.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, बर्‍हाणपूर, रावेर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक येथे थांबा देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर विशेष गाडी
डाऊन 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर ही गाडी प्रस्थान स्टेशनपासून 11.30 वाजता रवाना झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी जयनगर स्टेशन येथे 2.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 01062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी प्रस्थान स्टेशन पासून 1.00 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन येथे 12.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, बर्‍हाणपूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जाणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस पटना विशेष गाडी
डाऊन 03202 लोकमान्य टिळक टर्मिनस पटना विशेष गाडी 6 डिसेंबरपासून दररोज लोकमान्य टिळक टर्मिनसहुन 2.55 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी पटना स्टेशनला 11.55 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, निफाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, रावेर, बर्‍हाणपूर, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 03201 पटना-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 4 डिसेंबरपासून दररोज पटना स्टेशनहुन 11.55 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस 10.50 वाजता पोहोचेल. या गाडीला खंडवा, बर्‍हाणपूर, रावेर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, निफाड, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !