पाचोर्‍यातील तिघांकडून दोन पिस्टलसह सात जिवंत काडतुसे जप्त


पाचोरा पोलिसांची कामगिरी : गुन्ह्याच्या तपासात गवसली शस्त्रे

पाचोरा : किरकोळ वादातून शहरातील एकावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींचा शोध सुरू असताना शुक्रवारी रात्री तिघा संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून गावठी बनावटीच्या दोन पिस्टलसह सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत सूर्यकांत नाईक, अविनाश सूर्यकांत नाईक व निलेश अनिल सोनवणे (सर्व रा.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे, विनोद पाटील, किशोर पाटील, दीपक सुरवाडे, नंदकुमार जगताप, विश्वास देशमुख, पोलिस शिपाई किरण पाटील, विनोद बेलदार, दामोदर सोनार यांचया पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींविरुद्ध यापूर्वीदेखील गुन्हे
अटकेतील तिघे आरोपी सराईत असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत. 30 ऑगस्ट रोजी पाचोरा शहरात तिघाही अटकेतील आरोपींनी तक्रारदार विशाल राजेंद्र पाटील यांच्यावर किरकोळ वादातून लोखंडी चॉपरने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्यात वापरलेले हत्यार पाचोरा पोलिसांनी जप्त केले असून तपास उपनिरीक्षक दत्तात्रय नलवाडे करीत आहेत.


कॉपी करू नका.