बैलजोडी वाचवण्याच्या प्रयत्नात दोन बस धडकल्या : 15 विद्यार्थी जखमी


ममुराबाद फार्मसी महाविद्यालयाजवळील घटना : जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

जळगाव- जळगावकडून धामणगावकडे जाणार्‍या बसच्या चालकाने बैलजोडीला वाचवण्याच्या नादात समोरून येणार्‍या भरधाव बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 15 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. जखमींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव डेपोची बस क्रमांक (एम.एच.12 ए.एल.1428) नांद्राहुन-धामणगावकडे जळगावमार्गे जात असताना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ममुराबाद फार्मसी महाविद्यालयाजवळ रस्त्यावर जाणार्‍या बैलजोडीला वाचविण्याच्या नादात समोरून येणार्‍या मध्यप्रदेशातील बस (एम.पी. 09, एफ.ए.5581) ला जोरदार धडक दिली. या धडकेत जळगाव डेपोच्या बसच्याचालक साईडला धडक दिल्याने बसमधील 15 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

हे विद्यार्थी झाले जखमी
मोहिनी वनराज सपकाळे (19), हरेश्वर ज्ञानेश्वर सोनवणे रोहिणी अरुण सपकाळे (18), माया शिवदास सोनवणे (18), रोहित ज्ञानेश्वर न्यायदे (18), स्नेहा भास्कर भालेराव (18), मिताली विजय सोनवणे (18), सोनल गोपाल विसपुते (17), सुपडू सपकाळे (17), धर्मेश संजय सपकाळे (18), अक्षय विजय भालेराव (18), अक्षय गोपाल भालेराव (18), विक्रम नथ्थु सपकाळे (18), दिनकर सुनील सपकाळे (18) आणि वैभव घनश्याम खेडकर (18, सर्व रा.धामणगाव, ता.जि.जळगाव) यांना किरकोळ जखमा झाल्या. सर्व जखमींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.


कॉपी करू नका.