भुसावळात 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या


भुसावळातील दत्त नगरातील घटना : आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात : बाजारपेठ पोलिसांची घटनास्थळी धाव

भुसावळ : शहरातील दत्त नगर भागातील 23 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. बॉबी छगन देवरे (22) असे मयत तरुणाचे नाव आहे. बॉबी हा हातमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता शिवाय तो उत्कृष्ट बॉक्सरदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी दुपारी घरात बॉबीने गळफास घेत आत्महत्या केल्याने या भागात खळबळ उडाली. या प्रकरणी आकाश बाबू देवरे यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत बॉबीच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परीवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !