पत्नी विरह सहन न झाल्याने पतीची आत्महत्या
नागपूर : हिंगणा मार्गावरील पंचशील नगरातील प्रमोद किशोरीलाल महतो (26) या स्वच्छता कर्मचार्याने पत्नीच्या विरहात गळफास लावत आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. प्रमोदच्या पत्नीने महिनाभरापूर्वी घरगुती कारणावरून आत्महत्या केली होती. तेव्हापासून प्रमोद कमालीचा अस्वस्थ होता. त्याच्या घरच्यांनी आणि मित्रमंडींनी त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र पत्नीच्या विरहात कासावीस झालेल्या प्रमोदची मानसिक स्थिती सारखी बिघडतच गेली. गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास प्रमोदने गळफास घेतला. मयताचा भाऊ मनोज (35) याने दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.