चाळीसगाव रेल्वे स्थानकावर अनोळखी महिलेचा मृत्यू
चाळीसगाव- रेल्वे स्थानकावर 10 सप्टेंबर रोजी अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. उंची 5.5 फूट, नाक सरळ, रंग गोरा, डोळे बारीक, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे व पांढरे, चेहरा लांबट असे मयताचे वर्णन आहे. चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओळख पटत असल्यास चाळीसगाव लोहमार्गचे हवालदार प्रकाश पी.चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.