वृद्ध सुपरवायझरची हत्या : तिघांना अटक


नागपूर : वृद्ध सुपरवायझरला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगरात गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सम्हारू अवधू हरीजन (60) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी दिनेशकुमार मुन्ना लाला (23), बजरंगी लालचंद्रप्रसाद गौतम (21) व सुशीलकुमार दीपचंद गौतम (19, तिघेही रा.मोहम्मदपूर पुहाया, जि.शहाजानपूर, यूपी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ड्युटीवर जाण्यास सांगितल्याने केली हत्या
नाईट ड्युटीवर जायला सांगितले म्हणून तीन मजुरांनी सम्हारू यांची हत्या केल्याचे सांगण्यात आले. मयताचा भाचा संजीवा याने मेट्रोच्या वायरिंगचे कंत्राट घेते. त्यामुळे 2018 पासून सम्हारू नागपुरात राहायला आला. कामावरच्या मजुरांच्या हजेरी लावून त्यांचे पगार काढण्याचे काम सम्हारू करायचा. सम्हारू सोबत मजुरांच्या झोपड्यात लोकमान्यनगरात राहायचे. गांधीबागमध्ये त्यांचे काम सुरू होते. कंत्राटदाराचे वाहन त्यांना तेथून कामावरच्या ठिकाणी नेऊन सोडायचे आणि परत घेऊन यायचे. गुरुवारी दिवसभर काम करून ते रात्री झोपड्यांवर परतले. स्वयंपाक करून जेवायचे आणि झोपायचे, अशा तयारीत असताना रात्री 8 च्या सुमारास सम्हारूने या तिघांना कामावर (नाईट ड्यूटी) वर जाण्यास सांगितले. थकूनभागून आताच कामावरून परत आल्याचे सांगून आरोपींनी नाईट ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे सम्हारू त्यांच्यावर ओरडला. सम्हारू शिवीगाळ करीत असल्याचे पाहून दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी त्याच्यासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. आरोपी दिनेशकुमार याने जवळचा चाकू काढून सम्हारूच्या छातीवर वार केला. त्यामुळे सम्हारूचा जागीच मृत्यू झाला.आरोपी दिनेशकुमार, बजरंगी आणि सुशिलकुमार हे जबलपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसले मात्र एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कॉल लोकेशन काढून त्यांना कामठी मार्गावर धावत्या बसला अडवून ताब्यात घेतले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !