सिलिंडरमधून गॅसची चोरी करणारी टोळी जाळ्यात
पुणे : गॅस सिलिंडरमधील गॅसची चोरी करणारी टोळी सांगवी परीसरात पकडण्यात आली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 381 गॅसच्या रीकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचं समोर आलं असून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वक्षहष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सिसोदे, सोळंखे, पोलिस कर्मचारी कांबळे, बारकुले, करोटे, शिरसाठ, भारती, तिडके, लोंढे, असवले, मुठे, महिला पोलीस कर्मचारी जाधव, माने आणि गावडे, कचरे यांच्या पथकाने केली.







