जंक्शन स्थानकावरील गुन्हेगारी रोखण्यावर भर


लोहमार्गचे नूतन निरीक्षक दिनकर डंभाळे यांचा विश्‍वास

भुसावळ- भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन शहर असून वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यासह गुन्हे उघडकीस आणण्यावर भर राहणार असल्याचा विश्‍वास भुसावळ लोहमार्गचे नूतन पोलिस निरीक्षक दिनकर डंभाळे यांनी व्यक्त केली. निरीक्षक दिलीप गढरी यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नंदुरबार लोहमार्ग पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर डंभाळे यांची बदली करण्यात आली. शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला. डंभाळे हे यापूर्वी औरंगाबाद मुख्यालयात पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे वाचक होते.


कॉपी करू नका.