जळगावात लोकअदालत : 1270 प्रकरणांचा निपटारा
आठ कोटी 99 लाख रकमेची तडजोड : दाम्पत्यही आले एकत्र
जळगाव- राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण यांचे निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधीकरण व जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने 14 रोजी राष्ट्रीय लोक अदालत झाली. या न्यायालयात प्रलंबित असलेली 408 प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांपैकी 862 प्रकरणे अशी एकूण 1270 प्रकरणे निकाली निघाली असून 8 कोटी 99 लाख 37 हजार 674 एवढ्या रकमेची तडतोड झाली आहे.
जलद व सोप्या पध्दतीने मिळतो न्याय
लोक अदालतीच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव के.एच.ठोंबरे, जिल्हा सरकारी वकिल केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पी.बी.चौधरी यांच्यासह विधीज्ञ व कर्मचारी वर्ग तसेच पक्षकार हजर होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण यांचे संकल्प गीत वाजविण्यात येवून लोकअदालतीची सुरुवात करण्यात आली. न्या. जी.ए.सानप यांचे मार्गदर्शनाखाली पक्षकार त्याचप्रमाणे शासनाचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना आवाहन करण्यात येवून राष्ट्रीय लोकअदालतीमधये प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात जलद व सोप्या पध्दतीने न्याय मिळावा या संकल्पनेतून प्रलंबित 408 व वादपूर्व प्रकरणांपैकी 862 अशी एकूण 1270 प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली निघाली. या सर्व प्रकरणांमधून 8 कोटी 99 लाख 37 हजार 674 प्रकरणे तडतोडीव्दारे निकाली निघालह.
तीन महिन्यांपासून विभक्त दाम्पत्य एकत्र
राष्ट्रीय लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे एका पती-पत्नीमध्ये वाद होते. पतीने विधी सेवा प्राधीकरणाकडे वादपूर्व मध्यस्थी प्रकरण दाखल केले या वादपूर्व प्रकरणामधये गैर अर्जदार पत्नीस नोटीस देण्यात आली. या प्रक्रियेमध्ये पती व पत्नीकडील दोन्ही कुटूंब हजर होते. दोन्ही कुटुंबामध्ये विशेषतः पती पत्नीमधये वादपूर्व मध्यस्थीव्दारे प्रशिक्षित मध्यस्थीव्दारे मध्यस्थी घडवून आणली. वादपूर्व मध्यस्थी प्रकरण मिटल्यावर हे प्रकरण अंतिम तडतोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले. याप्रकरणात आज लोकअदालतीमधये तडजोड नाम्याव्दारे अंतिम हुकूमनामा पारित करण्यात आला. तीन महिन्यांपासून विभक्त राहत असलेले पती पत्नी समजोता झाल्याने एकत्र नांदावयास गेले आहेत. वादपूर्व मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांना वेळीच न्याय मिळतो तसेच मानसिक ताण कमी होवून आर्थिक बचत होती. अशाप्रकारे शहरातील हे पहिलेच तडजोड प्रकरण आहे. सर्व सामान्यांनी या प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा प्राधीकरणतर्फे करण्यात आले आहे.