खाजगी प्राथमिक शिक्षिका सुनीता इंगळे यांचा सन्मान
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
फैजपूर- बशिप्र संचलित प्राथमिक विद्यामंदिर, फैजपूर शाळेतील विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षिका सुनीता सोपानराव इंगळे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 ने खासदार रक्षा खडसे व मान्यवरांच्या हस्ते लेवा भवन, जळगांव येथे सन्मानित करण्यात आलेे. जळगाव येथील सरदार वल्लभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, रोटरी क्लब जळगाव सेंट्रल व युवा विकास फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराचे जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवना नुकतेच वितरण झाले.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर परमपूज्य शास्त्री पुरुषोत्तम प्रकाश राजनी महाराज शास्त्री, गोविंद प्रकाशदासजी, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोेळे, हाजी गफ्फार मलिक, डॉ.करीम सालार, डॉ.ए.जी.भंगाळे, जिल्हा परीषद अध्यक्ष उज्वला पाटील, रोटरी क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयूर, सुशील राका, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी महापौर तथा नगरसेवक विष्णूभाऊ भंगाळे तसेच रोटरी क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयुर व मित्रमंडळ यांनी आयोजित केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी आदर्श शिक्षिका सुनीता इंगळे यांच्यासह प्रा.उमाकांत पाटील, धांडे कोचिंगचे प्रा.एम.एन.फालक, अनुश्री फालक, डॉ.प्रशांत फालक, संतोष पाटील, प्रा.अतुल इंगळे, तारेश पाटील परिवारासह मित्र मंडळ तसेच जिल्ह्याभरातील मान्यवर शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती सुनिता इंगळे यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.