वरणगावकरांना मिळणार आता 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी


जलसंपदा मंत्र्यांच्या प्रयत्नातून 25 कोटी मंजूर : नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

भुसावळ- जलसंपदा व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र नगरोत्थान सुवर्ण जयंती महाभियानांतर्गत वरणगाव शहरासाठी 25 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना 13 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाचे सह सचिव पां.जोजाधव यांच्या स्वाक्षरीने मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. वरणगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी राज्य पाणीपुरवठा योजना निवड समितीची बैठक 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयात प्रधान सचिव मनीषा म्हस्कर , आयुक्त कृष्णा मथुन, नगराध्यक्ष सुनील काळे, मुख्याधिकारी शामकुमार गोसावी, गणेश चाटे, दौलतराव गुट्टे आदींच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत योजना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली.


कॉपी करू नका.