प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवणार


राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांची शिष्टमंडळाला ग्वाही

भुसावळ- प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या लवकरच सोडवल्या जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील राज्यमंत्री (गृह विधी व न्याय तथा संसदीय कार्य) यांनी अमरावतीत भेट घेतलेल्या शिष्टमंडळाला दिली. शिक्षकांच्या समस्यांबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेतर्फे अमरावती जिल्हाध्यक्ष वसीम फरहत, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद अहमद अली व इतर सदस्यांच्या उपस्थितीत रणजित पाटील यांची अमरावती येथे नुकतीच भेट घेतली. याप्रसंगी अमरावती जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सानप, उपशिक्षणाधिकारी प्रीती देशमुख, उपशिक्षणाधिकारी डॉ.नितीन उंडे, शिक्षण विभागाचे अधीक्षक पावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.