जामनेर-मुक्ताईनगर-मलकापूर रस्त्याची चाळण


वाहनधारक व प्रवासी त्रस्त : महाजनादेश यात्रेसाठी झाली होती डागडूजी

बोदवड : बोदवड येथून जामनेरकडे जाणार्‍या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांचे मात्र बारा वाजले आहेत परंतु याची दखल प्रशासन वा लोकप्रतिनीधी दखल घेत नसल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत. बोदवड शहरालगत जामनेर रस्त्यावर असलेले जुने तहसीलजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने मलकापूर, मुक्ताईनगर रस्त्यावरील बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात सत्र सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.