जळगाव एलसीबी निरीक्षक बी.जी.रोहम यांची निवडणूक कक्षात बदली


जळगाव : जळगाव एलसीबीचे निरीक्षक बापू रोहोम यांची मुंबईतील इलेक्शन सेल विभागात एका महिन्यांसाठी बदली करण्यात आल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अपर पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल (आस्थापना) यांच्या स्वाक्षरीचे आदेश गुरुवारी रात्री जिल्हा पोलीस दलात धडकताच चर्चांना ऊत आला. मविप्र संस्थेतील वाद प्रकरणात अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांना निरीक्षक रोहम व पथकान अटक केल्याने रोहम यांची बदली झाली असावी? अशी चर्चा पोलीस दलात आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील निवडणूक कक्षात बदली झाली आहे. दरम्यान, अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असलेल्या रोहम यांच्याविषयी कुठलीही तक्रार किंवा वाद नसताना बदली झाल्याने पोलिस खळबळ उडाली आहे. बदलीच्या वृत्ताला रोहम यांनी दुजोरा दिला.


कॉपी करू नका.