विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची सोशल मिडीयावर बदनामी : पाच जणांविरुद्ध गुन्हा


नाशिक : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा सोशल मिडीयावर शिवराळ टिप्पणीसह व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी भाजपाचे नाशिकरोड येथील ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या तक्रारीवरून रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहूल जोशी आणि बंटी ठाकरे अशा पाच जणांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रूग्णालयात व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर बदनामी केल्याचा वरील संशयीतांविरोधात आरोप आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !