‘जागतिक कामगारदिनी’ ‘कोरोनायोद्ध्यांचा महापौर महाजनांनी केला सन्मान
जळगाव : जळगावच्या प्रथम नागरीक महापौर जयश्री महाजन यांनी शनिवारी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून शहरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला.
या ‘कोरोनायोद्ध्यांचा केला सन्मान
यावेळी गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचा महापौरांनी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संचालक डॉ. शीतल ओसवाल, ‘सीईओ’ तेजस जैन व संदीप भुतडा यांच्याशी चर्चा करण्यात आली. ‘वसंतस् दि सुपरशॉप’ला भेट देऊन तेथील कर्मचार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संचालक नितीन रेदासनी यांनी स्वागत केले. मोटेल कोझी कॉटेजच्या पेट्रोलपंपाला भेट देऊन तेथील कर्मचार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालक प्रकाश चौबे हे महापौरांच्या अचानक भेट व कर्मचार्यांच्या केलेल्या सत्काराने भारावले व ‘माझ्या आयुष्यप्रवासात प्रथमच पेट्रोलपंपावरील कर्मचार्यांचा महापौरांकडून सत्कार व्हावा, ही बाब अतिशय संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. दि जळगाव पीपल्स बँक, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचाी सन्मान करण्यात आला. जळगाव शहर महानगरपालिकेच्या ‘कोविड-19’ लसीकरण केंद्रालाही महापौरांनी भेट दिली व डॉ. राम रावलानींची भेट घेत त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. औद्योगिक वसाहतीतील कोगटा उद्योग समूहाच्या गोपाल दालमिललाही भेट देण्यात आली. नामदेव कोळपे या कर्मचारी भावविभोर होऊन बाजूला होऊन म्हणाले, ‘मी बर्याच दिवसांपासून दालमिलमध्ये कार्यरत आहे. परंतु महापौरपदावरील एका महिलेच्या हातून माझा सत्कार होतो, ही गोष्ट माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी संचालक प्रेमभाऊ कोगटा, अनुप कोगटा, अतुल कोगटा व त्यांच्या सहकार्यांनीही महापौरांचा सत्कार केला.


