करेक्ट कार्यक्रम : पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे विजयी


पंढरपूर : राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला असून अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा तीन हजार 503 मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोण विजयी होणार ? याकडे लक्ष लागले होते. निवडीनंतर दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करण्यासह पाणीप्रश्‍न सोडवणार असल्याचे अवताडे म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !