काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
पुणे : पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू असताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले मात्र कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना ‘सायटोमेगँलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाली होती. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदारहोते तर माजी मंत्री रजनी सातव यांचे पूत्र होत.

