पाडळसेत कापसाच्या पराठ्यात अळ्या आढळल्याने खळबळ


यावल- तालुक्यातील पाडळसे येथे कपाशीच्या गेल्या वर्षाच्या साठवून ठेवलेल्या पराठ्या (कापूस काड्या) तून अचानक मोठ्या प्रमाणात अळ्या निघाली सुरुवात झाल्याने व या अळ्या सापाप्रमाणे रांगेत निघाल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भीती पसरली. कृषी व आरोग्य विभागाला कळवल्यानंतर या अळ्यांचा नायनाट करण्यात आला.
पाडळसे गावात बामणोद रस्त्यावर बेघर वस्ती असून तेथील रहिवासी नथ्थु

थायमेट टाकून अळ्या केल्या नष्ट
भोई यांनी गेल्या वर्षाच्या कापसाच्या पराठ्या साठवुन ठेवल्या होत्या. त्या पावसात भिजल्या व कुजल्याने त्यातून अळ्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली व मंगळवारी या अळ्या शेकडोंच्या संख्येत थेट सापाप्रमाणे एकामेकास जोडलेल्या अवस्थेत रस्त्यावर आल्याचे पाहून भीती पसरली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच रजनीकांत पाटील, सदस्य ज्ञानेश्वर तायडे, पोलिस पाटील सुरेश खैरणार यांनी या बाबत तहसीलदार जितेंद्र कुवर यांना कळवले. त्यांनी कृषी विभागास सूचना केल्या व गावात आरोग्य विभागाचे पथकासह कृषी विभागाचे कृषी सहाय्यक एम.जी आगीवाल दाखल झाल्यानंतर त्यांनी पराठ्या व अळ्यांवर थॉयमेट टाकुन त्या नष्ट केल्या.


कॉपी करू नका.