भुसावळ विधानसभा निवडणूक : संजय ब्राह्मणेंकडून मतदारांच्या गाठी-भेटींना सुरूवात


भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना इच्छूक उमेदवारांनी मतदारांशी जनसंपर्क वाढवला आहे. गतवेळी शिवसेनेकडून नशीब आजमावणारे उच्च शिक्षीत उमेदवार संजय ब्राह्मणे आता काँग्रेसकडून इच्छूक असून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी व पीआरपीने भुसावळातील जागेवर दावा केला असलातरी अद्याप ही जागा कुणाला सुटेल हे निश्‍चित नाही मात्र असे असलेतरी ब्राह्मणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारांशी संपर्क वाढवला आहे. भुसावळ विभागातील विविध गावांना ते भेटी देत असून मतदारांशी संपर्क साधत आहेत.

भुसावळात ‘चाय पे चर्चा’
संजय ब्राह्मणे यांनी सोमवारी जाम मोहल्ला भागातील किताब घरला भेट देत मुस्लीम बांधवांशी संवाद साधला. दुपारी वरणगाव रस्त्यांवरील कार्यकर्त्यांशी भेट घेवून चर्चा केली. के.बी.काझी यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार ब्राह्मणे व मुन्वर खान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुसरी येथे त्यांनी भेट देत शैलेश बोदेडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनीतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या निवासस्थानी व कार्यकर्त्यांची बैठक घेत निवडणुकीच्या रणनीतीविषयी विचार-विमर्श करण्यात आला. उपसरपंच रईस मेंबर यांचीही भेट घेण्यात आली. प्रसंगी मतदार व कार्यकर्त्यांकडून ब्राह्मणे यांना जोरदार प्रतिसार मिळाल्याचे मुन्वर खान म्हणाले. यावेळी जाम मोहल्यात हाजीम सलीम भाई, जमील शेख, नसीम तडवी, वरणगावचे शहराध्यक्ष अशपाक काझी, शैलेश बोदोडे, प्रा.मनोज, के.बी.काझी, भुसावळ काँग्रेसचे मेहबूब खान, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, ईस्माईल गवळी, शहराध्यक्ष सलीम गवळी व मुस्लिम कॉलनी, खडका येथील ईद्रीस खान, ईम्रान खान व अनेक पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.