जळगावात आचारसंहितेचा भंग : तीन जणांविरुद्ध गुन्हा


जळगाव- आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जळगावात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय पक्षाच्या वाढदिवसाचे फलक आकाशवाणी चौकात लावण्यात आल्याने तीन जणांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहिता लागू झाल्यावर जळगाव महानगरपालिकेने शहरातील सर्व राजकीय संघटनेचे पोस्टर्स, बॅनर, झेंडे, फलक आणि मतदारांवर प्रभाव पडेल अशा सर्व वस्तू हटविल्या होत्या मात्र शहरातील आकाशवाणी चौकात सामाजिक वनिकरण विभागाच्या हद्दीत त्यांच्या मालकीच्या होर्डींगवर आचार संहिता असतांना सोमवारी सकाळी नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाबाबत शिवसेना पक्षाच्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे होर्डींग लावल्याप्रकरणी वसुली विभागाचे लिपिक अजय उध्दव बिर्‍हाडे यांच्या फिर्यादीवरू सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनधिकारी, शिवसेनेचे नीलेश पाटील आणि साईमोह क्रिएशन अ‍ॅडव्हर्टायझर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात लोकप्रतिनिधी नियम कलम 126 सह महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम सन 1995 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.