शेळगावच्या तरुणाचा थ्रेशर मशीनमध्ये पाय अडकल्याने मृत्यू


जळगाव : तालुक्यातील शेळगाव येथील तरुणाचा थ्रेशर मशीनमध्ये पाय अडकल्याने त्याचा मृत्यू ओढवला. रविवारी दुपारी दीड वाजता ही दुर्दैवी घटना घडली. विजय राजाराम कोळी (36) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेळगाव शेत शिवारात भूषण दिलीप पाटील यांच्या शेतावर रोजंदारीने थ्रेशर मशिनद्वारे उडीद मूग काढण्याच्या कामासाठी विजय कोळी हा तरुण गेला मात्र दुपारी दिड वाजता मशीनवर चढत असतांना तोल जाऊन त्याचा पाय मशीनमध्ये अडकला व काही क्षणातच त्याचा प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मजुरांनी तत्काळ मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश चौधरी यांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाच्या पश्‍चात पत्नी सरला, मुलगा ओम, मुलगी प्रांजल, आई-वडील, दोन भाऊ व बहिण असा परिवार आहे.


कॉपी करू नका.