विवाह होत नसल्याच्या नैराश्यातून चिंचोलीच्या तरुणाची आत्महत्या
यावल : विवाह होत नसल्याने आलल्या नैराश्यातून 31 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचोलीत सोमवारी सकाळी उघडकीस आली. राजू खंडू माळी असे मृत तरुणाचे नाव आहे. ररू माळी यांनी रविवारी गावालगतच्या मंगल उखर्डू सपकाळे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले. विहिरीला भरपूर पाणी असल्याने रविवारी रात्री उशीरापर्यंत तरुणाचा मृतदेह हाती लागला नव्हता त्यामुळेसोमवारी विहिरीतून पाण्याचा उपसा केल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मृतदेह काढण्यात यश आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला. या घटनेने चिंचोली गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.