भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले

भुसावळ- शहरातील रेल्वे फिल्टर हाऊसजवळील रहिवासी व अल्पवयीन असलेल्या तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. इफ्तेखार मेहमूद पठाण (29) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. 17 वर्षीय तीन महिने वय असलेल्या तरुणीस अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तपास शहर पोलिस ठाण्याचे एएसआय युनूस ईसा शेख करीत आहेत.

