माजी मंत्री खडसेंना तिकीट नाकारल्याने रावेरच्या कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रावेर : माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे भाजपाने तिकीट कापल्यानंतर शहरातील खडसे समर्थक असलेल्या नानाभाऊ महाजन यांनी रावेरमधील भाजप कार्यालयासमोर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे यांना ही माहिती मिळताच त्यांनी समर्थक नानाभाऊ महाजन यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. पक्ष बदनाम होईल असे कोणतीही कृती करू नका, असे आवाहन खडसे यांनी समर्थकांना केले आहे.

