भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला अटक


शहर पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारावर कामगिरी

भुसावळ : शहरातील राहुल नगर भागातील एका तरुणाकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुस असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली. रवींद्र शामराव भालेराव (35, राहुल नगर, तापी पुलाजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. ही कारवाई भुसावळचे उपअधीक्षक गजानन राठोड व शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केली.

जंक्शन ठरतेय शस्त्र तस्करीचे केंद्र
गुरुवारी सायंकाळीच एलसीबीने दोघांनी दोन कट्टा व जिवंत काडतुसांसह अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी पुन्हा रात्री कट्ट्यासह आरोपी पकडल्याने भुसावळ शहर हे शस्त्र तस्करीचे केंद्र तर ठरत नाही ना? असा प्रश्‍न विचारण्यास वाव आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !