धक्कादायक ! : अहवालात छेडछाडसाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला दिली पाच लाखांची लाच


मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिरद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितल्याने खळबळ उडाली आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळच्या अधिकार्‍याचा जबा देखील घेण्यात आला. त्या अधिकार्‍यानं देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन त्यानं पाच लाख रुपए सिक्रेट सर्व्हिस फंडातून काढून सायबर एक्सपर्टला दिले होते.

सायबर एक्सपर्टनं एनआयएला दिला जबाब
सायबर एक्सपर्टनं एनआयएला आपला जबाब दिला होता. ज्यामध्ये सायबर एक्सपर्टनं सांगितलं की, अँटिलिया घटनेनंतर ‘जैश-उल-हिंद’ या अतिरेकी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच अँटिलिया प्रकरणात समोर आलेल्या जैश उल हिंदच्या षडयंत्रात परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याता संशय आहे. मात्र त्यांनी आपल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांचा रोल काय आहे याबाबत काही लिहिलेलं नाही. मात्र आता सायबर एक्सपर्टनं परमबीर यांचं नाव घेतलं आहे. ज्या अधिकार्‍यानं ही गोष्ट कबूल केली आहे तो अधिकारी मागील दहा वर्षांपासून परमबीर सिंह यांच्यासोबत काम करत आहे. हा अधिकारी सध्या होम गार्ड विभागात पोस्टेड आहे. याच ठिकाणी परमबीर सिंह देखील डीजी आहेत. साल 2006 मध्ये परमबीर सिंह हे एटीएस मध्ये होते तेव्हापासून सदर अधिकारी त्यांच्यासोबत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !