नंदुरबार जिल्हा परीषदेत शिवसेना-काँग्रेसने राखली सत्ता


भाजपाच्या तीन जागा घटल्या तर राष्ट्रवादीनेही उघडले खाते

नंदुरबार : जिल्हा परीषदेच्या 11 गटांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर बुधवारी झालेल्या मतमोजणीत शिवसेना-काँग्रेस पक्षाने यश मिळवत सत्ता पुन्हा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. मतमोजणीनंतर 11 पैकी चार जागांवर भाजप तर काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी तीन जागांवर यश मिळवले असून राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत खाते उघडत एक जागा पटकावली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील 11 गटांचे सदस्यांचे पद रद्द झाले होते त्यात नंदुरबार तालुक्यातील पाच, शहादा तालुक्यातील 4 तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटांचा समावेश होता.

राष्ट्रवादीने खाते उघडले तर भाजपाच्या जागा घटल्या
जिल्हा परीषदेच्या 11 गटांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर बुधवारी सकाळी मतमोजणी झाली. त्यात भाजपाला चार, काँग्रेससह शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळाले. दरम्यान यापूर्वी- भाजपाकडे सात, काँग्रेसकडे व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन जागा होत्या मात्र आता काँग्रेससह शिवसेनेची एक जागा वाढली असून राष्ट्रवादीने एका जागेवर यश मिळवले असून भाजपाच्या मात्र तीन जागा घटल्या आहेत.






काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम
सध्या जिल्हा परीषदेवर काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. ती कायम राखण्यात या दोन्ही पक्षांना यश आले आहे. आता सध्या काँग्रेसचे 24 व शिवसेनेच्या आठ असे एकूण 32 सदस्य झाले आहेत तर राष्ट्रवादीचा त्यांनाच पाठिंबा राहणार आहे. भाजपच्या एकूण 23 जागा होत्या त्यात आता तीन जागा घटल्याने त्या 20 वर आल्या आहेत.

सुप्रीया गावीत विजयी मात्र पंकज गावीत पराभूत
माजी मंत्री विजयकुमार गावीत व भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ते तथा खासदार हिना गाविी यांनी निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती त्यात त्यांच्या कुटुंबातीलच दोन उमेदवार होते. गावीत यांच्या कन्या सुप्रिया गावीत विजयी झाल्या मात्र कोपर्ली गटात त्यांचे पुतणे पंकज गावीत यांना पराभूत व्हावे लागले.

नंदुरबार- जिल्हा परीष गट विजयी उमेदवार…
1) म्हसावद- हेमलता अरुण शितोळे (काँग्रेस)
2) कोळदा- डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत (भाजपा)
3) लोणखेडा- जयश्री दीक पाटील (भाजपा)
4) खापर- गीता चांद्या पाडवी (काँग्रेस)
5) पाडळदा- मोगनसिंग पवनसिंग शेवाळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
6) कोपर्ली- अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना)
7) कहाटूळ- राऊळ ऐश्वर्या जयपालसिंग (भाजपा)
8) रानाळे- शकुंतला सुरेश चित्रे (शिवसेना)
9) खोंडामळी- शांताराम पाटील (भाजपा)
10) शनिमांडळ- जागृती सचिन मोरे (शिवसेना)
11) अक्कलकुवा- मक्राणी सुरय्याबी अमिन (काँग्रेस)

पक्षीय बलाबल असे-
भाजपा- 4
शिवसेना- 3
काँग्रेस- 3
राष्ट्रवादी काँग्रेस- 1
पोटनिवडणुकीतील एकूण- गट 11



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !