उमाळा घाटात चाकूचा धाक दाखवत ट्रक चालकाला लुटले : दोघे पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबविणार्‍या दोघांना जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी रात्री 9 वाजता नशिराबाद येथून अटक केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राम मुकेश करोसिया (21, रा.भवानी नगर, नशिराबाद) व राजेंद्र सुकलाल भोई (20, निमजाई माता मंदीर नगर, नशिराबाद) अशी अटकेतील दोन्ही संशयीतांची नावे आहेत.

ट्रक चालकाला अडवून केली लूट
सोनाजी अशोक मिरगे (30, रहमेबाद, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) हे ट्रक चालक असून ते सतपाल शर्मा यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच.46 एफ.5345) वर चालक आहेत. 5 जून रोजी रात्री 8.30 वाजता सोनाजी मिरगे यांनी तालुक्यातील चिंचोली येथील गोडावूनमधून रीकाम्या बाटल्यांचा माल घेवून ट्रकने औरंगाबाद येथे जात असतांना उमाळा घाटात रात्री 11.30 वाजेच्या सुमारास चार जण दुचाकीवरून आले व त्यांनी ट्रकसमोर दुचाकी उभी केली. चाकूचा धाक दाखवत ट्रक चालकाकडे पैसे मागण्यात आले मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे ट्रक चालकाने सांगितले. यावेळी ट्रक चालकाच्या खिश्यातील सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चौघे एकाच दुचाकीने पसार झाले. ट्रक चालकाने दुचाकीचा क्रमांक (एम.एच 19 डी.ए.1283) क्रमांक लक्षात ठेवत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दुचाकीच्या क्रमांकावरून दोन संशयीत आरोपी हे नशिराबाद येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयीत आरोपी राम मुकेश करोसिया (21, रा.भवानी नगर, नशिराबाद) व राजेंद्र सुकलाल भोई (20, रा.निमजाई माता मंदिर नगर, नशिराबाद) यांना गुरूवारी रात्री 9 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली तर अन्य दोघा पसार संशयीतांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !