जुनोने गावातील 22 वर्षीय तरूण बेपत्ता


चाळीसगाव : गावात जाऊन येतो, असे सांगून गेलेला तरूण बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील जुनोने येथे उघडकीला आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील जुनोने येथील शेख सलमान शेख सलीम (22) हा रविवार, 17 ऑक्टोबर रोजी घरच्यांना गावात जाऊन येतो, असे सांगून गेला. मात्र तो अद्यापपर्यंत घरी परतला नाही. म्हणून घरच्यांनी त्याला आजपावेतो परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु तो मिळून आला नाही. शेख सलमान शेख सलीम हा हरवल्याची खात्री झाल्यानंतर त्याचे वडील शेख सलीम शेख गुलाब यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ओंकार भास्कर सुतार हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !