तोतया पोलिसांनी वृद्धाच्या हातातील अंगठ्या लांबवल्या : चाळीसगावातील घटना
चाळीसगावात तोतया पोलिसांनी वृद्धाला गंडवले : शहर पोलिसात गुन्हा दाखल
चाळीसगाव : पोलीस असल्याचे सांगत चाळीसगावातील वृद्धाला तोतया पोलिसांनी गंडवल्याची घटना 18 ऑक्टोबर रोजी चाळीसगावातील रेल्वे उड्डाण पुलावर घडली. भामट्यांनी वृद्धाच्या हातातील 12 व 7 ग्रॅमची अंगठी लांबवून पलायन केले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस असल्याचे सांगत केली फसवणूक
तक्रारदार रामा चिंधा बोरसे (65, पुन्शी पेट्रोल पंपाच्या मागे, धुळे रोड, चाळीसगाव) हे 18 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता चाळीसगाव शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या 30 ते 40 वयोगटातील दोघांनी पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला अडवलत बोलण्यात गुंग ठेवून हातचलाखीने वृद्धाच्या हातातील 30 हजार रुपये किंमतीची 12 ग्रॅमची व 17 हजार 500 रुपये किंमतीची 7 ग्रॅमची अंगठी घेवून पोबारा केली. एका संशयीताचे वय 35 ते 40, शरीराने मजबुत, उंची सुमारे 5.5 फुट, रंगाने गोरा, अंगात खाकी रंगाची फुल पँन्ट, लाल रंगाचा चेक्सचे शर्ट तसेच दुसर्याचे वय 30, रंगाने गोरा, उंची सुमारे 5 फुट, काळसर रंगाची पँन्ट, फिकट तपकिरी रंगाचा शर्ट परीधान केला होता, असे तक्रारीत नमूद आहे. 47 हजार 500 रुपये किंमतीच्या अंगठ्या लंपास केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार किशोर साहेबराव सोनवणे ेकरीत आहेत.

