गावठी हातभट्टीवर छापे : तिघांविरोधात गुन्हा
जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानळदा, आसोदा आणि निमखेडी परीसर अश्या तीन ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणार्या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जळगाव तालुक्यातील कानळदा, आसोदा आणि निमखेडी परसरात काही व्यक्ती गावठी बनावटीची दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांच्यासह पोलीस पथकाने शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान तीनही ठिकाणी छापा टाकला.
या आरोपींकडून दारू जप्त
संशयीत आरोपी निलेश उर्फ भोला माधवराव पाटील (कानळदा, ता.जळगाव) यांच्या ताब्यातून एक हजार 800 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या तर आसोदा येथील संशयीत आरोपी संदीप तुळशीराम कोळी यांच्याकडून 30 लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली व निमखेडी येथील संशयीत आरोपी दीपक राजाराम कोळी यांच्याकडून एक हजार 8 रुपये किंमतीची 20 लिटर दारू जप्त करण्यात आली. तीनही कारवाईत तीन हजार 948 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

