जळगावात तलवारीच्या धाकावर दहशत : तरुणाला अटक
जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगर परीसरात विनापरवाना हातात तलवार घेवून परीसरात दहशत माजवित असलेल्या तरूणाला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. तलवार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रामानंद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठ्ठल नगर परीसरात संशयीत आरोपी अक्षय प्रकाश गवई (21, रा.कुसुंबा, ता.जि. जळगाव, ह.मु.हरीविठ्ठल नगर) हा तरूण रविवार, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता हातात तलवार घेवून परीसरात दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार रामानंदनगर पोलिसांचे पथक रवाना झाले. पोलिसांनी संशयीत आरोपी अक्षय गवई याला तलवारीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भरत चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार दीपक शिरसाठ करीत आहे.

