शिंदाडला विवाहितेचा विनयभंग ; एकाविरोधात गुन्हा


पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील 24 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील 24 वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह राहते. शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता संशयीत आरोपी सुनील भगवान पाटील याने घरात अनधिकृतपणे घरात प्रवेश करून विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक धीरज मंडलिक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !