प्रेमात आकंठ बुडालेली कोट्यधीश विवाहिता 13 वर्षांनी लहान रीक्षा चालकासोबत पळाली
इंदौर : इंदुरच्या कोट्याधीश व्यक्तीची पत्नी 21 ऑक्टोबरला तिच्यापेक्षा 13 वर्षाने लहान रीक्षा वाल्यासोबत पळून गेली होती. यावेळी ती तिच्यासोबत घरातील 47 लाख रूपये कॅश आणि काही दागिने घेऊन गेली. प्रेमात पडल्यानंतरही ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. सोबतच पळून जाताना त्यांनी साधारण 30 लाख रूपये कॅश रितेश ठाकूर नावाच्या तरूणाकडे दिले होते आणि बाकी 17 लाख रूपये घेऊन दोघे पळून गेले. पोलिसांनी रितेश नावाच्या तरूणाला अटक करून चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधिकारी दिनेश शर्मा म्हणाले की, एक महिला बेपत्ता झाल्याचं तक्रार आली होती. ज्यात महिलेचा शोध घेतला जात होता. रीक्षा चालकाचा एक साथीदार रितेशला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून 30 लाख रूपये ताब्यात घेतले. पोलीस म्हणाले की, महिला आणि आरोपी रीक्षा वाल्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रेम प्रकरणातून महिला घरातून पळून गेली.
