पहूरला अल्पवयीन मुलीचा विनयभंग


पहूर, ता.जामनेर : शहरातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून विनयभंग केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुलगी सायकलीने घरी जात असतांना गावातील अक्षय अर्जुन मोरे (व0) याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. पोलिसात गेलीस तर मुले जमा करून मारहाण करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडीत मुलीने संशयीत आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !