लग्नाच्या आमिषाने तरुणाकडून दोन लाख लाटले : दागिने लांबवणार्या दोघांविरोधात गुन्हा
चाळीसगाव : तालुक्यातील डामरूण येथील तरूणाचे लग्न लावून देण्याचे सांगून दोन जणांनी दोन लाख रूपये रोख व सोन्याचे दागिने घेवून पळ काढला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.चाळीसगाव तालुक्यातील डामरूण येथील 28 वर्षीय तरूण शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. औरंगाबाद येथील आशा संतोष शिंदे आणि किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील (रा.आमडदे, ता. भडगाव) यांनी तरूणाचे लग्न लावून देतो असे सांगून तरूणाकडून 2 लाख रूपये रोख व 40 हजार रूपयांचे दागिने 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान घेवून पसार झाले. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
भुसावळकरांना मोठा दिलासा : खड्डेमय रस्त्यांना डांबरीकरणाचे पॅचवर्क
