विवाहितेचा 10 लाखांसाठी छळ ; पतीसह चौघांविरोधात गुन्हा
जळगाव : 10 लाख रूपये आणावेत या मागणीसाठी तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहिता फरदोस जबीन अब्दुल अजित (21, रा.कंचनपूर, ता.उतरौला, जि.बलरामपूर, उत्तरप्रदेश) यांचा विवह अब्दुल अजित मोहम्मद मुबारक यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर तीन महिन्यांनी पती अब्दुल अजिज याने पत्नी ला कार घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. सासू, दीर आणि नणंद यांनी देखील पैश्यांसाठी गांजपाठ केला. दरम्यान, हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता नशिराबाद येथे माहेरी निघून आल्यात.
नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विवाहितेच्या फिर्यादीवरून पती अब्दुल अजीत मोहम्मद मुबारक, सासू कैसरजहा मोहम्मद मुबारक, दिर अब्दुल वाहिद मोहम्मद मुबारक आणि नणंद मैमुनाबी मोहम्मद सद्दाम (सर्व रा.कंचनपूर, ता.उतरौला, जि.बलरामपूर, उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शिवदास चौधरी करीत आहेत.

