एनसीसीत भरतीचे स्वप्न अपूर्ण : मैदानी चाचणीदरम्यान धावताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


चाळीसगाव : शहरातील कोतकर महाविद्यालयात एनसीसीच्या भरतीसाठी आलेल्या 18 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. कैलास वासूदेव राठोड (18, शिंदी) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चक्कर येवून पडल्याने तरुणाचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील कैलास वासुदेव राठोड (18) हा तरुण एनसीसीच्या भरतीसाठी शहरातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे कोतकर महाविद्यालयात बुधवारी आला होता. मैदानी चाचणी दरम्यान पळताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही दुदैवारी घटना घडली. कैलास वासूदेव राठोड या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे हलवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !