निमखेडी शिवारात एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
जळगाव : शेजारी राहणार्या व्यक्तीमुळे घर विक्री केले जात असल्याचा संशयावरून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी परीसरातील शिवधाम मंदिराजवळ रवींद्र भिवा सोनवणे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या शेजारी महेंद्र नामदेव रोकडे राहतात. महेंद्र रोकडे यांचे घर विक्रीला काढले आहे, याला कारणीभूत रवींद्र सोनवणे असल्याचा संशयावरून महेंद्र रोकडे याने सोनवणे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमीवस्थेत रवींद्र सोनवणे यांना तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे
जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
उपचार घेतल्यानंतर शनिवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सोनवणे यांच्या जबाबावरून संशयीत आरोपी महेंद्र रोकडे याच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.

